जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेला वेठीस धरण्याचे प्रकार सहन केले जाणार नाही- पालकमंत्री ना. अनिल परब
जिल्हावासियांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यासाठीच सिव्हिलमध्ये लॅब उभारण्यात आली आहे. जिल्हा नियोजन समितीकडे कोरोना हेडसाठी ८ कोटी रुपयांचा निधी राखून ठेवण्यात आला आहे. संबंधित ठेकेदाराचे प्रलंबित असलेले ४७ लाख रुपयांचे बिल तात्काळ मंजूर केले जाणार असल्याची माहिती पालकमंत्री ना. अनिल परब यांनी दिली. स्वॅब नमुन्यांची तपासणी सिव्हिलमध्येच होणार असल्याचे ना. परब यांनी सांगितले. जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेला वेठीस धरण्याचे प्रकार सहन केले जाणार नसल्याची संतप्त प्रतिक्रिया ना. परब यांनी बोलताना दिली. नवीन लॅबमध्ये तीन हजाराहून अधिक स्वॅब नमुन्यांची तपासणी करण्यात आली. उदघाटनापूर्वी ३५०० स्वॅब कीट सिव्हिलमध्ये कोल्हापूरच्या एका ठेकेदाराकडून पाठविण्यात आले होते. सदर किटचे ३६ लाख रुपयांचे बिल सिव्हिलला देण्यात आले होते. सदरचे बिल अद्यापही ठेकेदाराला प्रदान न केल्याने त्याने स्वॅब कीट पाठविण्यास असमर्थता दर्शविली आहे. लॅबमध्ये दररोज २०० स्वॅब नमुन्याची तपासणी केली जाते. एका कीटमध्ये १६ नमुने तपासले जातात. दिवसभरात तीन टप्प्यात स्वॅब नमुन्यांची तपासणी केली जाते. कोल्हापुरच्या ठेकेदाराला आणखी २५०० स्वॅब कीटची ऑर्डर ई निविदा सुचनेनुसार देण्यात आली आहे. थकित असलेल्या ४७ लाख रुपयांचे बिल अदा केल्याशिवाय नवीन ऑर्डरनुसार स्वॅब कीट पुरविले जाणार नसल्याचे ठेकेदाराने सिव्हिलला कळविले आहे.
konkantoday.com