
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात प्लाझ्मा केंद्र सुरु करणार
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात प्लाझ्मा थेरपी वाढवण्याचे ठरवले आहे. आता प्रत्येक जिल्ह्यात प्लाझ्मा केंद्र सुरु करत आहोत. कोरोनाला रोखण्यासाठी ही थेरपी उपयुक्त ठरत आहे. १० पैकी नऊ रुग्णांना प्लाझ्मा थेरपीचा फायदा होत आहे. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात प्लाझ्मा केंद्रही सुरु करत आहोत, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.दरम्यान, आयसीयूमध्ये दाखल असलेल्या रुग्णांना नातेवाईक सीसीटीव्हीमुळे बघू शकतात, यासाठी सीसीटीव्ही बसविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
www.konkantoday.com