कऱ्हाड चिपळूण रेल्वे मार्गासह व सातारा-पुणे डबल ट्रॅकचे कामासाठी पुण्यात बैठक- उदयनराजे भोसले
साताऱ्यात रेल्वेचा मोठा प्रोजेक्ट आणण्यासाठी केंद्रीय पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. सातारा जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्राला त्याचा लाभ होणार आहे. रेल्वेच्या बोगी बनविण्याचा प्रकल्पासाठी जिल्ह्यातील शासनाची उपलब्ध असलेल्या जागेचा वापर केला जाणार आहे. हा प्रकल्पाचा आराखडा आम्ही केंद्राकडे सादर केला आहे, अशी माहिती साताऱ्याचे भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली.
कऱ्हाड चिपळूण रेल्वे मार्गासह व सातारा-पुणे डबल ट्रॅकचे काम भूसंपादनात रखडले आहे. त्यावर मार्ग काढण्यासाठी येत्या आठ जुलैला पुण्यात बैठक होणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
www.konkantoday.com