कंपनीच्या कामात स्थानिकांना प्राधान्य द्या, एल ऍण्ड टी कंपनी कडे शिवसैनेची मागणी
अंजनवेल येथील आरजीपीपीएल एलएनजी जेटी परिसरात गेल कंपनीमार्फत सुरू होणार्या बॅकवॉटरचा ठेका प्रसिद्ध एल ऍण्ड टी कंपनीला मिळाला आहे. पुढील तीन वर्षे चालणार्या या कामामध्ये लागणारे कामगार व यंत्रसामुग्रीसाठी गुहागर तालुक्यातील स्थानिकांचा प्राधान्याने विचार करावा, स्थानिकांकडे दुर्लक्ष केल्यास शिवसेना स्टाईलने समज देऊ, असा इशारा गुहागर तालुका शिवसैनिकांच्यावतीने कंपनी व्यवस्थापनाला देण्यात आला.
रत्नागिरी गॅस आणि विद्युत असो वा गेल आणि एचएनर्जी कंपनीचे गॅस पाईपलाईनचे काम या सर्वच कामांमध्ये स्थानिक कामगारांना व स्थानिक ठेकेदारांना सातत्याने डावलण्याचे प्रकार घडले आहेत. या ठिकाणी आवश्यक असलेल्या कुशल व अकुशल कामगारांचा मोठा भरणा आहे. तसेच लागणारी यंत्रसामुग्रीही तालुक्यातील ठेकेदाराकडे आहे. त्यामुळे एल ऍण्ड टी कंपनीने पुढील दोन महिने चालणार्या कामामध्ये प्राधान्यक्रमाने स्थानिकांचा विचार करावा, असा इशारा कंपनीच्या अधिकार्यांना देण्यात आली.
www.konkantoday.com