
अवैध मासेमारीमुळे माशांचे साठे नष्ट झाले असून राज्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत मत्स्य उत्पादनामध्ये ३२ टक्क्यांची घट
पर्ससीन तसेच एलईडी लाइटच्या अवैध मासेमारीमुळे माशांचे साठे नष्ट झाले असून राज्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत मत्स्य उत्पादनामध्ये ३२ टक्क्यांची घट झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. सेंट्रल मशीन फिशरीज रिसर्च इन्स्टिटय़ूटच्या (सीएमएफआरआय) अहवालात ही बाब नमूद करण्यात आली आहे. गेल्या ४५ वर्षांमधील ही सर्वात मोठी घट असून दोन हजार कोटी रुपयांची वार्षिक निर्यात ९०० कोटींवर येऊन ठेपली आहे.
सेंट्रल मरीन फिशरीजच्या आकडेवारीनुसार २०१९मध्ये महाराष्ट्रा ८७.४टक्के यांत्रिकीकृत, १२.४टक्के मोटार संचालित आणि फक्त ०.२ टक्के पारंपरिक पद्धतीने मासेमारी करण्यात आली. याची नोंद १५८ केंद्रावरून करण्यात आली.
www.konkantoday.com