
स्वतः गाडी चालवत पंढरपूरला महापूजेसाठी जाणारे उद्धव ठाकरे हे पहिलेच मुख्यमंत्री
यंदाची आषाढी वारी साधेपणानंच साजरी झाली. ना गजबलेला चंद्रभागेचा काठ दिसला. ना मंदिर परिसरात भक्तीसागराचं दर्शन झालं. करोनामुळे साधेपणानंच विठू माऊलीची महापूजा करण्यात आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पत्नी रश्मी ठाकरे यांच्यासह पंढरपूरला गेले आणि विठ्ठलाची पूजा केली. मात्र, मुंबई ते पंढरपूर या प्रवासात मुख्यमंत्र्यांनी स्वतःच गाडी चालवली. स्वतः गाडी चालवत पंढरपूरला महापूजेसाठी जाणारे ते पहिलेच मुख्यमंत्री ठरले.
www.konkantoday.com