स्थानिक उत्पादनांना बाजारपेठेत ब्रँड मिळवून दिला आणि खेडी स्वयंपूर्ण झाली, तर आगामी काळात आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पूर्ण होईल–अविनाश धर्माधिकारी
भारताकडे सर्व प्रकारची नैसर्गिक साधनसंपत्ती मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. संशोधनाची जोड देऊन त्याचा स्थानिक पातळीवर कुशलतेने वापर केल्यास खेडी स्वयंपूर्ण बनतील. स्थानिक उत्पादनांना बाजारपेठेत ब्रँड मिळवून दिला आणि खेडी स्वयंपूर्ण झाली, तर आगामी काळात आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पूर्ण होईल,” असे प्रतिपादन माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी केले.
दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) पुणे शाखा आणि वेस्टर्न इंडिया चार्टर्ड अकाऊंटंट स्टुडंट्स असोसिएशन (विकासा) पुणे शाखा यांच्या वतीने सीए स्थपना दिनानिमित्त आयोजित ‘आत्मनिर्भर भारत’ या विषयावरील व्याख्यानात (लाईव्ह वेबिनार) अविनाश धर्माधिकारी बोलत होते.
www.konkantoday.com