लॉकडाऊनच्या पहील्या दिवशी मंडणगड तालुक्यात सर्वच ठिकाणी शंभर टक्के बंद

रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढल्याने जिल्ह्याधिकारी यांनी ब्रेक दे चेनची साद घालत १ ते ८ जुलै दरम्यान आठ दिवसाचे कालावधीसाठी घोषीत केलेल्या लॉकडाऊनच्या पहील्या दिवशी मंडणगड तालुक्यात सर्वच ठिकाणी शंभर टक्के बंद पाळण्यात आला. मंडणगड शहराची बाजारपेठ व तालुक्यातील देव्हारे, कुंबळे, म्हाप्रळ, पंदेरी, वेसवी, बाणकोट या ठिकाणी जीवनावश्यक औषधांची दुकाने वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्यात आल्याचे दिसून आले. तर शहर परिसरात मास्कचा वापर न करणाऱ्या ११३ नागरिकांवर मंडणगड नगरपंचायतीने दंडात्मक कारवाई केली असून आतापर्यंत ५६ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button