
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई करत रत्नागिरीत गोवा बनावटीचा ४९ हजार ४०० मद्यसाठा केला जप्त
रत्नागिरी शहरातील मांडवी भागात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई करत ४९ हजार ४०० रुपये किंमतीचा गोवा बनवटीचा मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे. मद्यसाठ्यासह अरविंद भिवाजी चौघुले या आरोपीला अटक करण्यात आली सदर आराेपीने लाॅकडाॅउनकाळात जास्त दराने मद्य विकण्यासाठी साठा केला हाेता
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक डॉ. तडवी यांचे मार्गदर्शनाखाली निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क रत्नागिरी शहर या कार्यालयामार्फत
सदर कारवाई निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क रत्नागिरी शहर विभागाचे निरीक्षक श्री. पांडुरंग पालकर, दुय्यम निरीक्षक किरण पाटील, भरारी पथक रत्नागिरी सहाय्यक दुय्यम निरीक्षक विजय हातिसकर, , दु निरीक्षक सुनील सावंत जवान सागर पवार वाहनचालक मलिक धोत्रे व विशाल विचारे, जवान वैभव सोनावले व मानस पवार यांनी केली.
www.konkantoday.com