आत्महत्येचा विचार करणाऱ्या तरुणाचे रत्नागिरी पोलिसांनी वाचवले प्राण
बारामती वरून एका युवतीने पोलीस कंट्रोल रूमला फोन केला, “ माझा भाऊ जीव देतो आहे, कृपया त्याला वाचवा “ अशी विनंती तिने पोलीस कंट्रोल ला केली. कंट्रोल ने लगेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिरीष सासने यांना खबर दिली व त्या युवतीला हि पोलीस निरीक्षक सासने यांचा संपर्क क्रमांक दिला.
PI. सासने यांना त्या युवतीचा फोन येताच त्यांनी तिला धीर देऊन लगेच तिच्याकडून तिच्या भावाचा मोबाईल आणि गाडी नंबर घेतला. पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे व अपर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली श्री सासणे यांनी गुन्हे शाखेतील PN रमिज शेख यांना तिच्या भावाचा मोबाईल ट्रेस करायला सांगितला. शेख यांनी काही क्षणातच मोबाईल अंजनवेल, गुहागर येथून दापोली-दाभोळ रोडला जात असल्याचे समजले. लगेच पोलीस निरीक्षक सासने यांनी गुहागर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक बोडके आणि दापोलीचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांना कल्पना दिली व ३ पथके त्या युवकाला शोधण्यसाठी पाठवले. दरम्याने स्थानिक गुन्हे शाखा लोकेशन वर लक्ष ठेऊन होतेच आणि सागरी पथकाला हि सतर्क राहण्यास सांगितले होते.
नानटे या गावा जावळ त्या युवकाची गाडी दापोली पोलिसांना रस्त्याच्या कडेला गाडी सापडली. आजूबाजूला शोधल्यावर तो युवक हि सापडला . त्या युवकाला दापोली पोलिसांनी समुपदेशन करून आत्महत्या करण्या पासून थांबविले व पोलीस स्टेशन ला आणले, नंतर त्याच्या खेड येथील त्याच्या मेव्हुण्यांकडे सुपूर्द करण्यात आले.
दापोलीत पोलिसांच्या पथकामध्ये पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, हवालदार संदीप गुजर, कॉन्स्टेबल सुनील पाटील, कोंकणी, कांबळे दुसऱ्यामध्ये सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शांताराम रहाटे, हवालदार दिपक गोरे तर तिसर्या मध्ये पोलीस उपनिरीक्षक कदम आदी होते
नागरिकांना लक्ष्यात घ्यावे कि जीवन हे अमूल्य आहे. नैराश्यामध्ये जाऊन स्वतः चा जीव द्यावा ही बाब अत्यंत दु:खद आहे. आपल्याला जर नैराश्याने ग्रासले असेल, तर आमच्याशी संपर्क करा, मानसोपचार तज्ञांची मदत घ्या. कोणतीही समस्या तुमच्या जीवापेक्षा मोठी असू शकत नाही.
रत्नागिरी पोलीस नेहेमी आपल्यासाठी , आपल्या सुरक्षेसाठी आपल्यासोबत राहील.
कोणतीही मदत हवी असल्यास रत्नागिरी कंट्रोल रूम क्र. ०२३५२ २२२२२२ येथे संपर्क करावा हि विनंती.