आता बचतगटांची उत्पादने ही ऍमेझॉन आणि जीईएम’ (GeM) या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर
करोना संकटकाळात बचतगटांही मोठा फटका बसला आहे. लॉकडाउनमुळे ग्राहकांनाही बचतगटांच्या वस्तुंपासून वंचित रहावे लागले. पण आता बचतगटांची उत्पादने ही ऍमेझॉन आणि जीईएम’ (GeM) या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे बचतगटांना व्यवसाय आणि ग्राहकांना त्यांच्या वस्तू सुलभरित्या घरपोच मिळणार आहेत, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.
या उपक्रमाचा प्रारंभ आज मंत्रालयात मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव अरविंदकुमार, आर. विमला, दादासाहेब गुंजाळ आदी उपस्थित होते. सध्या ऍमेझॉनवर ३३, तर जीईएम पोर्टलवर ५० उत्पादनांची नोंद करण्यात आली आहे.यामुळे या उत्पादनांना आता आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध झाली आहे.
www.konkantoday.com