
सिंधुदुर्ग जिल्ह्यात २ ते ८जुलै या कालावधीत लॉकडाऊन
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या २१४ वर पोहचली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाचा काढता आलेख रोखण्यासाठी २ते ८जुलै या कालावधीत संपूर्ण जिल्हा लॉकडाऊन ठेवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच या काळात पूर्कीसारखा कडक पोलीस बंदोबस्त राहील, असेही जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांनी यांनी स्पष्ट केले.जिल्ह्यातून पर राज्यात जाणार्या नागरिकांना ईपास घेऊन रत्नागिरी रेल्वे स्टेशनपर्यंत पोहचता येईल. तसेच अत्यावश्यक परिस्थितीतच नागरिकांनी बाहेर पडावे. मात्र कोणत्याही अत्यावश्यक कारणाशिवाय आढळल्यास पोलीस कारवाई करण्यात येईल. पूर्वीप्रमाणे गुन्हे दाखल होतील व वाहनजप्तीची कारवाई होईल असेही जिल्हा पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केले.
www.konkantoday.com