
राजापूर तालुक्यातील वेत्ये समुद्र किनाऱ्यावर आढळली कासवाची अंडी
रविवारी वेत्ये येथे ऑलिव्ह रिडले कासवाची ६१ अंडी आढळून आली. समुद्र किनाऱ्यावर फेरफटका मारताना कासवमित्र गोकुळ जाधव यांना ही अंडी आढळून आली असून त्यांनी वनविभागाच्या मार्गदर्शनाखाली किनाऱ्यावर घरटे करून योग्यपद्धतीने त्यांचे संवर्धन केले आहे. गेल्या काही वषार्पासून तालुक्याच्या पश्चिम सागरी किनारपट्टीवरील भागामध्ये ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या कासवाची अंडी सापडत आहेत. मात्र, गेल्या काही महिन्यांमध्ये पर्यावरणामध्ये झालेल्या प्रतिकूल बदलांचा परिणाम झाल्याने सागरी किनारपट्टीच्या वाळूमध्ये अंडी घालण्यासाठी येणाऱ्या ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या कासवांचे आगमन यावर्षी लांबणीवर पडणार की काय याबाबत उत्सुकता लागून राहीली होती. मात्र, या महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये दरवर्षीप्रमाणे कासवे अंडी घालण्यासाठी वेत्ये किनारपट्टीवर आली आहेत.
www.konkantoday.com