रत्नागिरी येथील होंडा दुचाकी शोरूममधून सव्वादोन लाखांच्या बॅटऱ्यांचा व दुचाकी एक्सेसरीजचा अपहार ,तीन कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
रत्नागिरी येथील साळवीस्टॉप नजीक असलेल्या होंडा दुचाकी शोरुममधील चेतन दुडय़े ,स्वप्नाली पवार ,प्रणय शेलार या कर्मचाऱ्यांनी आपल्या ताब्यात असलेल्या एक्साइड व टाटा या कंपनीच्या सव्वा दोन लाखाच्या किमतीच्या बॅटऱ्यांचा व मोटारसायकल व स्कूटरच्या ऍक्सेसरीजस्पेअर पार्टचा अपहार केला म्हणून त्यांच्या विरोधात रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात याबाबत शोरूमचे मालक राजेंद्र केशव जोशी यांनी याबाबत अपहाराची तक्रार दाखल केली आहे जोशी यांची साळवीस्टॉप येथे होंडा दुचाकीची शोरूम असून यामध्ये वरील तिन्ही कर्मचारी काम करतात या शोरूममध्ये बॅटऱ्या पीडिआयचे प्रमुख चेतन दुडय़े व स्वप्नाली पवार यांच्या ताब्यात एक्साइड व टाटा कंपनीच्या७० हजार किंमतीच्या बॅटऱ्या सोपविण्यात आल्या होत्या तसेच मोटारसायकल व स्कूटर एक्सेस स्पेअर पार्ट विभागातील प्रणय शेलार यांचे कडे १लाख ५३किमतीचे अॅक्सेसरी स्पेअरपार्ट आदिची जबाबदारी होती या तीन कर्मचाऱ्यांनी बॅटरी व स्पेअरपार्टचा अपहार केला म्हणून त्यांचे विरोधात रत्नागिरी पोलीस स्थानकात अपहाराची तक्रार दाखल करण्यात आली आहे
www.konkantoday.com