रत्नागिरी तालुक्यातील नेवरे गावातील महिलेची ७६ हजारांची आॅनलाईन फसवणुक
बँकेतून बोलतोय असे सांगत नेवरे येथिल महिलेची आॅनलाईन ७६,१५८ रुपयांची फसवणुक करण्याचा प्रकार घडला आहे
रत्नागिरी तालुक्यातील नेवरे गावातील उषा खेर यांना अज्ञात इसमाने बँकेतून बोलतोय असे सांगत ७६,१५८ रुपयांचा गंडा घातला. या इसमाने महिलेच्या मोबाईल वर मेसेज व फोन करून बचत खात्याची माहिती घेऊन तुमच्या खात्याची के. वाय. सी. करणे गरजेचे असून ते न केल्यास खाते बंद होईल असे सांगत लिंक पाठवून खात्यातील ७६,१८५ रुपयांची रक्कम ऑनलाईन काढून फसवणूक केली आहे. याबाबत महिलेने फसवणूकीची तक्रार ग्रामीण स्टेशनला केली आहे
www.konkantoday.com