
बाजारपेठेत गर्दी होणारी दुकाने सुरूच, कोरोनाची चेन तोडणे अशक्य -शिरीष काटकर
मेडिकल वगळता सर्वच दुकाने बंद ठेवून कडक लॉकडाऊन पाळायला हवा. लॉकडाऊनची घोषणा होताच नागरिकांनी बाजारपेठेत गर्दी करून पंधरा दिवस पुरेल इतक्या जीवनावश्यक वस्तूंची खरेदी केली आहे. मात्र लॉकडाऊन काळात ज्या ठिकाणी गर्दी होते अशी मच्छि, मटण, अंडी, भाजीपाला, फळांची दुकाने सुरूच राहणार असल्याने कोरोनाची चेन तोडणे अशक्य असल्याचे शिरीष काटकर यांनी म्हटले आहे. ही सर्व दुकाने सुरू ठेवून शासनाला नेमके काय साध्य करायचे आहे असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
konkantoday.com