पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढीचा सर्वसामान्यांवर काही प्रभाव नाही-केंद्रीय पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान
एकीकडे लॉकडाउनमुळे सर्वसामान्य नागरिक आर्थिक संकटात असताना दुसरीकडे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात रोज वाढ होत आहे. दरम्यान केंद्रीय पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढल्याने त्याचा सर्वसामान्यांवर काही प्रभाव पडत नाही असं म्हटलं आहेधर्मेंद्र प्रधान यांनी इंधनाच्या वाढत्या दरांचं समर्थन करताना म्हटलं की, “जागतिक स्तरावरही खूप मोठी आव्हानं उभी राहिली आहेत. यामुळे जगभरात इंधनाच्या मागणी आणि पुरवठ्यावर परिणाम झाला आहे.अशा परिस्थितीतत पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दराचा प्रभाव सर्वसामान्यांवर पडलेला नाही असं धर्मेंद्र प्रधान यांनी यावेळी सांगितलं. “जेव्हा कुटुंबात एखादी समस्या येते तेव्हा भविष्यातील आव्हानांना सामोरं जाण्यासाठी आर्थिक नियोजन केलं जातं. इंधनाच्या वाढत्या दराकडे तसंच पाहिलं गेलं पाहिजे,” असं धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटलं आहे.
“इंधनामधून मिळणारा कर महसूल देशातील लोकांच्या आरोग्य, रोजगार आणि आर्थिक सुरक्षेसाठी वापरला जात आहे,” अशी माहिती यावेळी त्यांनी दिली. धर्मेंद्र प्रधान यांनी यावेळी इंधनाच्या वाढत्या दरावरुन देशभरात आंदोलन केल्याबद्दल काँग्रेसवरही टीका केली. सोनिया गांधी आणि काँग्रेसला गरीब लोकांचं भलं झालेलं पहावत नाही असा टोला त्यांनी लगावला आहे.
www.konkantoday.com