पाली ते साखरप्यापर्यंत अनेक ठिकाणी पहिल्याच पावसात मोठमोठे खड्डे पडले
रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावर पाली ते साखरप्यापर्यंत अनेक ठिकाणी पहिल्याच पावसात मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
यावर्षी पावसाळयाला सुरुवात झाली तरी अद्यापही हे खड्डे भरले गेले नाहीत. त्यामुळे दुचाकीसह छोट्या वाहनांना खड्ड्यांचा मोठा त्रास होत आहे. काही वेळा अपघातही घडत आहेत. त्याकडे राष्ट्रीय महामार्ग विभाग दुर्लक्ष करीत आहे. या महामार्गावर मोठ्या प्रमाणावर सध्या अवजड वाहतूक सुरू असून त्यामुळे या रस्त्याची आणखी दुरवस्था होत आहे. त्यामुळे किमान आता पावसाळयाची सुरुवात असतानाच राष्ट्रीय महामार्ग विभागाने तातडीने लक्ष देऊन खड्डे बुजवावेत, अशी मागणी होत आहे.
www.konkantoday.com