खेड येथे बांधकाम कंपनीकडे पन्नास हजाराचा हप्ता मागणाऱ्या आरोपीला अटक
खेड येथे महामार्गाचे काम करणाऱ्या कल्याण टोल इन्फास्ट्रक्चर लिमिटेड या रस्ते बांधकाम करणाऱ्या कंपनीच्या व्यवस्थापकाकडे पन्नास हजाराचा हप्ता मागणाऱ्या सूर्यकांत दत्ताराम आंब्रे राहणार चिरणी खेड याच्या विरोधात खेड पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.कल्याण टोल इन्फास्ट्रक्चर लिमिटेड ही कंपनी रस्ते बांधकाम करते या कंपनीने चिरणे येथे जमीन मालकाशी करार करून या जागेत खडी क्रशर उभा केला आहे या कंपनीचे व्यवस्थापक श्रीकांत कांबळे हे कार्यालयात बसले असताना आरोपी सूर्यकांत आंब्रे तेथे आला त्याने फिर्यादी यांना मला भाड्याव्यतिरिक्त ५० हजार रुपयांचा हप्ता द्या तरच तुम्हाला येथून माल उचलू देईन नाहीतर माल उचलू देणार नाही कोण आला तर त्याला ठार मारतो अशी धमकी दिली व पैशाची मागणी केली परंतु फिर्यादी यांनी पैसे देण्यास नकार दिला यानंतर आरोपीने कंपनीचे क्रशर कडे येणारे ट्रक दगडी ठेवून व वाटेत स्वतःची स्कॉर्पिओ गाडी उभी करून रस्ता बंद केला व कंपनीच्या कच्च्या मालाची वाहतूक करणाऱया डंपरची अडवणूक केली म्हणून आरोपींविरोधात खेड पोलीस स्थानकात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे
www.konkantoday.com