
अंजनवेल येथे मच्छीमार बोटीतून डिझेलची तस्करी, नऊ जण ताब्यात, घेतले बोटीसह दोन कोटीचा मुद्देमाल जप्त
रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर पोलीस ठाणे हद्दीतील अंजनवेल येथे गस्त करीत असताना गुहागर पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार अंजनवेल जेटी किनारी रात्री ०१ ते ०३ या दरम्यान अवैधरित्या एका मच्छिमारी बोटीतून डिझेलची तस्करी करत असताना मोटर व पाईपच्या साहाय्याने अवैध रित्या डिझेल तस्करी करीत असताना नऊ जणांना गुहागर पोलिसांनी ताब्यात घेतले.तस्करीसाठी वापरण्यात आलेले साहित्य मच्छिमारी बोट, बोटीवरील मोटर व पाईप, टँकर एमएच-४६-बीएम-८४५७, बलेनो कार एमएच-४६-बीके-२५६८, मच्छिमार बोटीतून मोटर व साहित्य याच्या सहाय्याने २५००० लिटर डिझेल, आरोपीच्या ताब्यातील नऊ मोबाईल असे मिळून एकूण – २,०५,९५,००० ( दोन करोड पाच लाख पंच्याण्णव हजार) किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच एकूण नऊ संशयितांना ताब्यात घेण्यात आले.