
कै. कृष्णामामा महाजन स्मृती प्रतिष्ठान कोळथरे तर्फे नुकसानग्रस्ताना १५ हजार रोपांचे वाटप.
दापोली :-(वार्ताहर)निसर्ग चक्रीवादळाने दापोली तालुक्यातील आंजर्ले , आडे,मुर्डी, केळशी, हर्णे या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुपारी/नारळ/आंबा बागायतदार हा अनेक वर्ष कष्ट करून बागायत उभी करत असतो आणि सद्य स्थितीत चक्रीवाळाच्या तडाख्यामुळे बागायतदार १५ वर्ष मागे गेले आहेत. बऱ्याच बागायतदारांचे घर संसार, त्यांची उपजीविका ही याच बागायतीवर अवलंबून होती आता ती होत्याची न्हव्हती झाली आहे या परिस्थितीतून सावरण्यासाठी आपणच पुढे होऊन त्याना मदत केली पाहिजे हे कोकण वासीयांनी ओळखले आहे आणि त्या परीने मदत कार्य सुरूही आहे. नवीन लागवड करण्यासाठी आवश्यक असणारी रोप घेणे सुद्धा काही ठिकाणी अशक्य आहे. या गोष्टीचे सामाजिक भान जोपासत कै. कृष्णामामा महाजन स्मृती प्रतिष्ठान ने क्राउड फंडींग सुरू करून या क्राउड फंडींग च्या माध्यमातून गरजू बागायत दारांना रोपांचे वाटप करण्याचे ठरवले. यात एकूण १५ हजार रोपांचे वाटप करण्यात येणार आहे . अंजर्ले व मूर्डी या गावांमध्ये नारळ, सुपारी व आंबा या झाडांच्या ३००० रोपांचे वाटप करून अभियानाला सुरवात करण्यात आली. यावेळी मिहिर महाजन, कौस्तुभ भावे, अमोल शिगवण,
ओंकार लागू ,श्रवण दांडेकर, नरेंद्र जोशी, गौरिप्रसद जोशी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
येणाऱ्या काळात अधिकाधिक मदतीचे संकलन करून निसर्ग वादळग्रस्तांना पुन्हा उभं राहण्यासाठी हात देण्याचा मानस असून यासाठी सर्व जागृत नाकरिकांनी प्रतिष्ठान मार्फत नियोजित मदत करावी असे आवाहन मिहीर महाजन यांनी केले आहे.
www.konkantoday.com