
जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मोहित गर्ग यांच्या संकल्पनेतून रत्नागिरी शहर लवकरच सव्वीस ठिकाणी कॅमेरे बसवण्यात येणार
संपूर्ण रत्नागिरी शहर लवकरच सीसीटीव्हीच्या नजरेत येणार आहे. त्या अनुषंगाने शहरातील २६ ठिकाणे निश्चित केली असून ८० कॅमेरे बसविण्याचे नियोजन आहे. शहराच्या प्रत्येक प्रवेशद्वारापासून अंतर्गत महत्त्वाच्या ठिकाणांचा समावेश आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मोहित गर्ग यांच्या संकल्पनेतून ही योजना राबविली जाणार आहे. या सर्व सीसीटीव्हीचे कंट्रोलरूम तयार करून एका ठिकाणी ठेवून संपूर्ण शहरावर वॉच ठेवता येणार आहे.
प्राथमिकदृष्ट्या २६ स्पॉट निश्चित केले आहेत. या स्पॉटवर डे-नाईट सीसी टीव्ही कॅमेरे बसविणार आहेत. त्यासाठी एक नियंत्रण कक्ष बनविण्याचा आराखडा तयार केला जाणार आहे. गुन्हेगारीला आळा घालण्याच्यादृष्टीने ही योजना महत्त्वाची आहे.साळवी स्टॉप, नवलाई मंदिर नाचणे, मारुती मंदिर, उद्यमनगर, मजगाव तिठा, शासकीय विश्रामगृह, जेलनाका, सिव्हिल हॉस्पिटल, जयस्तंभ, रामनाका, भुतेनाका, भाटे चेकपोस्ट, परटवणे, सावरकर चौक, हिंदू कॉलनी, मांडवी बिच, मिरकरवाडा, काजरघाटी तिठा, विमानतळ, पंधरामाड, भाटे बीच, गोखले नाका, कर्ला तिठा, आरटीओ ऑफिस, जे. के. फाईल्स ही ठिकाणे निश्चित केली आहेत. याबाबत बैठक घेऊन निर्णय होणार आहे.
www.konkantoday.com