
महाराष्ट्र नाट्य व सांस्कृतिक कार्यक्रम वितरक-व्यवस्थापक संघाची स्थापना , जिल्ह्यातील तिघाचा समावेश
मुंबई विभाग वगळता उर्वरित महाराष्ट्रातील नाट्यवितरक व व्यवस्थापक यांनी एकत्र येवून महाराष्ट्र नाट्य व सांस्कृतिक कार्यक्रम वितरक-व्यवस्थापक संघाची नुकतीच स्थापना केली. या संघात जिल्ह्यातील विजय कुबडे, किशोर सावंत तसेच योगेश कुष्टे यांचा समावेश आहे.
या संघटनेची पहिली सभा १९ जुलै रोजी झू ऍपद्वारे संपन्न झाली. यावेळी १४ सभासद उपस्थित होते. प्रारंभी गिरीश महाजन यांनी सर्वांचे स्वागत केले तर आनंद कुलकर्णी यांनी संस्थेची उद्दिष्टे स्पष्ट केली. सभेमध्ये संस्थेचे नियोजित पदाधिकारी, कार्यकारी समिती सदस्य व निमंत्रित सदस्यांची निवड एकमताने करण्यात आली. यावेळी अध्यक्षपदी जयप्रकाश जातेगावकर, कार्याध्यक्षपदी गिरीश महाजन, उपाध्यक्षपदी मोहन कुलकर्णी, समीर पंडित, प्रमुख कार्यवाह म्हणून आनंद कुलकर्णी, कार्यवाहपदी प्रविण दर्वे, संदीप सोनार, खजिनदारपदी समीर हंपी यांची निवड करण्यात आली.
www.konkantoday.com



