२ जुलैपासून महाराष्ट्रामध्ये वरुणराजा अगदी मुसळधार बरसणार
जुलै महिन्याच्या सुरुवातीला म्हणजेच २ जुलैपासून महाराष्ट्रामध्ये वरुणराजा अगदी मुसळधार बरसणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळं बळीराजाला किमान दिलासा मिळण्याची चिन्हं दिसत आहेत.
सध्याच्या घडीला कोकण, गोवा, मराठवाड्यातील काही भाग आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात पावसाची सुरुवात झाली आहे. हाच पाऊस येत्या काही तासांमध्ये चांगला जोर पकडणार आहे. शिवाय रायगड, रत्नागिरी या भागांमध्ये आणि त्यासोबतच पुणे- सातारा भागातही मान्सून सक्रिय होऊन मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.
www.konkantoday.com