लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर मद्यप्रेमींचा यावेळी मात्र सावध पवित्रा
रत्नागिरी जिल्ह्यात प्रशासनाने १ जुलै ते ८ जुलै असा कडक लॉकडाऊन केल्याने नागरिकांना बाहेर पडता येणार नाही. गेल्या वेळी लॉकडाऊन लांबल्याने मद्यप्रेमींची मोठी अडचण निर्माण झाली होती. त्यामुळे लॉकडाऊन संपून मद्य दुकाने कधी उघडणार याकडे डोळे लागले होते. शेवटी शासनाने मद्य दुकानांने उघडण्यास परवानगी दिल्यानंतर मद्यप्रेमींनी मोठी गर्दी केली होती. आता प्रशासनाने रत्नागिरी जिल्ह्यात ८ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केल्याने मद्यप्रेमींनी सावध पवित्रा उचलला आहे. परवा संध्याकाळपासूनच मद्यविक्रीच्या दुकानात मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. अनेक मद्यप्रेमींनी पुढील काळाची तरतूद म्हणून पुरेसा मद्यसाठा करण्यावर भर दिल्याचे दिसत होते. यामुळे यावेळी मद्यप्रेमींनी लॉकडाऊन वाढला तरी आपल्या साठ्याची तरतूद केली असून तेही लॉकडाऊनसाठी सज्ज असल्याचे दिसत आहे.
www.konkantoday.com