भारताने चीनवर थेट ‘डिजिटल स्ट्राईक’ ,मोदी सरकारनं टिकटॉकसह ५९ चिनी अ‍ॅपवर घातली बंदी

१५ जून रोजी झालेल्या संघर्षामध्ये भारताचे २० जवान शहीद झाल्यानंतर देशातून चिनी मालावर बहिष्कार टाकण्याची मागणी जोर धरु लागली होती. केंद्र सरकारनं सीमेवरील तणाव निवळण्यासाठी लष्करी चर्चा सुरू केली आहे. तर दुसरीकडे चिनी अ‍ॅपमधून भारतीयांची माहिती दुसऱ्यांना देशांना पाठवली जात असून, त्यावर बंदी घालण्याचा इशारा गुप्तचर यंत्रणांनी सरकारला दिला होता. त्या पार्श्वभूमीवर भारताने चीनवर थेट ‘डिजिटल स्ट्राईक’ करण्याचा निर्णय घेतला आहे. मोदी सरकारनं सोमवारी टिकटॉकसह ५९ चिनी अ‍ॅपवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला.भारत सरकारने बंदी घातलेल्या अ‍ॅपच्या यादीमध्ये केवळ मोजकी अ‍ॅपही प्रचंड लोकप्रिय होती. बंदी घालण्यात आलेल्या ५९ चिनी अ‍ॅप्सपैकी भारतात असणाऱ्या शाखांमध्ये केवळ १० ते १२ लोकं काम करायची. या ५९ पैकी बहुतांश कंपन्या भारतामध्ये अगदी अल्प मनुष्यबळाच्या मदतीने काम करत होत्या. मात्र याच यादीमधील १० ते १५ कंपन्यांवर प्रत्येकी ४०० ते ५०० लोकांचा रोजगार अवलंबून होता. बंदी घालण्यात आलेल्या टिकटॉक, शेअरइट, यूसी ब्राउजर, हॅलो, बिग लाइव, सेल्फीसिटी, मास्टर, पॅरलल स्पेस, एमआय व्हिडिओ कॉल झिओमी आणि विसिंक असे काही अ‍ॅप्स आहेत
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button