काल राज्यात कोरोनाचे ५२५७ रुग्ण वाढले
काल राज्यात कोरोनाचे ५२५७ रुग्ण वाढले आहेत. गेल्या ३ दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णांची संख्या ५ हजारांपेक्षा अधिक संख्येने वाढत आहे. राज्यात गेल्या ४८ तासात ७८ रुग्णांचा मृत्यू झाला असून आधीच्या कालावधीतील १०३ आणखी रुग्णांची कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. सध्या राज्यात मृत्यूदर हा ४.४८ टक्के इतका आहे.
काल राज्यात २३८५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत ८८,९६०रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण आता ५२.३७ टक्क्यावर पोहोचलं आहे.
www.konkantoday.com