बारा लाखांच्या लॉटरीचे आमिष दाखवून तरुणाला १ लाख ३३हजाराचा गंडा
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड एमआयडीसी करणारा संदीप कुमार दास या तरुणाला अज्ञात अनोळखी इसमानी तुम्हाला खरेदी केलेल्या ब्ल्यू टुथ डिव्हाइसवर १२ लाख २५हजार रुपयांची लॉटरी लागली आहे असे सांगून त्याच्याकडून गुगल पे द्वारे १ लाख ३३ हजार ९५० रुपये उकळून त्याची ऑनलाइन फसवणूक केली
खेड एमआयडीसी येथे राहणारा संदीप दास याने ऑनलाईनवरून ब्ल्यूटूथ डिव्हाइस खरेदी केला होता यानंतर त्यांच्या मोबाइलवर अनोळखी इसमाने फोन करून तुम्हाला १२लाख २५हजारांची लॉटरी लागली आहे असे सांगून रजिस्टेशन फी जीएसटी आरबीआय टॅक्स से टॅक्स भरावे लागणार असल्याचे सांगून फिर्यादी दासांचे कडून १लाख ३३हजार ९५०रुपये गुगल पे अॅपद्वारे वेगवेगळ्या खात्यात भरून घेतले व त्याची मोठी फसवणूक केली .आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर या तरुणाने खेड पोलीस स्थानकात फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे पोलिसांनी अज्ञातांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे
www.konkantoday.com