जयगडमध्ये आलेल्या जहाजावरील व संक्रमित कर्मचाऱयांच्या साहित्याची विल्लेवाट सार्वजनिक ठिकाणी लावल्याबद्दल पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल
जयगड येथील आंग्रे पोर्टवर आलेल्या प्रिया -२३या जहाजावरील कोरोना संक्रमीत कर्मचारी तसेच जहाजावरील साहित्याची विल्लेवाट करण्याकरता देण्यात आलेले साहित्य यातील आरोपी समीर खान राहणार बाजारपेठ रत्नागिरी २)असलम कर्लेकर ३)फकीर पांजरी ४)सिकंदर पटेल राहणार साखर तर ५)मिलिंद बनप राहणार रत्नागिरी यांनी त्याची योग्य रितीने काळजी घेऊन विले वाट लावणे आवश्यक होते परंतु तिथे न करता सार्वजनिक ठिकाणी हे साहित्य आणून टाकले यामुळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
यातील आरोपीनी हे साहित्य बोलेरे टेम्पोमधून साळवीस्टॉप ते परटवणे या रोडवर फिनोलेक्स कॉलनी समोर मोकळ्या जागेत आणून टाकले त्यांच्या या कृत्यामुळे कोरोना पसरू शकेल हे माहित असताना देखील त्यांनी ही कृती केली याबाबत स्थानिकांनी तक्रार केल्यावर पोलिसाने त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे
www.konksntoday.com