
चक्रीवादळाच्या नुकसान भरपाईवरून केळशीत राडा
चक्र्रीवादळाने झालेल्या घरांच्या हानीची पाहणी करण्यासाठी आलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना केळशी गावातील कांदेवाडी येथील ११ ग्रामस्थांनी आमच्या वाडीत कोणतेच नुकसान झाले नसल्याचा अर्ज दिला होता. मात्र ज्यांच्या घरांचे नुकसान झालेले होते अशा महिला वाडी अध्यक्षांना याबाबत विचारणा करण्यासाठी गेले असता वाडी अध्यक्षांच्या पत्नीने व अन्य उपस्थितांनी शिवीगाळ करून धक्काबुक्की केल्याची तक्रार योगिता खांबे यांनी दाखल केली असून वाडी अध्यक्ष अनंत मिसाळ यांनीही ३२ संशयितांविरोधात शिवीगाळ व मारहाणीची तक्रार दाखल केली आहे.
www.konkantoday.com