कोल्हापुरातील एका सलून व्यावसायिकाने चक्क सोन्याच्या कात्रीनं ग्राहकांचे केस कापले
कोल्हापूरकरांच्या हौसेला मोल नसतं याचं प्रत्यय पुन्हा अनेकांना आला. तीन महिन्यानंतर सलून व्यवसायाला परवानगी मिळाली. याचा आनंद कोल्हापुरातील एका सलून व्यावसायिकाने चक्क सोन्याच्या कात्रीनं ग्राहकांचे केस कापत साजरा केला. रामभाऊ संकपाळ असे या हौशी सलून व्यावसायिकाचे नाव आहे. रामभाऊ यांच्या या आनंद व्यक्त करण्याच्या अनोख्या पद्धतीने ग्राहकांना देखील आज अनपेक्षित सुख मिळाले
www.konkantoday.com