
कोकण रेल्वे चालकाचे हदय विकाराच्या झटक्याने निधन
रत्नागिरी शहरातील कारवांची वाडी येथे राहणारे माधव वसंत मुळे या कोकण रेल्वे चालकांना आरवली रेल्वेस्थानकात हृदयविकाराचा झटका आला त्यांना तातडीने डेरवण येथे रुग्णालयात नेण्यात आले परंतु तेथे त्यांचा उपचाराच्या दरम्यान मृत्यू झाला.माधव मुळे हे कोकण रेल्वेत चालक असून ते२७ तारखेला आपल्या सहकाऱ्यांसह बोलेरो गाडीतून आरवली रेल्वेस्टेशन येथे आले तेथे सामान घेऊन ते बाजूला असलेल्या हॉटेलमध्ये बाकड्यावर बसून पाणी पिऊन त्यांनी चहाची ऑर्डर दिली त्यानंतर अचानक येथून खाली जमिनीवर पडले त्यांच्या सहकाऱयांनी तातडीने प्रथम खासगीरुग्णालयात त्यानंतर डेरवण येथील हॉस्पिटलमध्ये नेले परंतु तेथे त्यांचा उपचाराच्या दरम्यान मृत्यू झाला
www.konkantoday.com