आयुष्य पूर्वपदावर आणण्यासाठी कंबर कसून उभा राहिलेल्या अलिबागकरांस विक्रांत वार्डे यांचा मदतीचा हात
अलिबाग (प्रवीण रा. रसाळ)
“फाटलं आभाळ,
विस्कटला संसार,
तरी ना हार मानली,
वादळा बघ आम्ही,
पुन्हा कंबर कसली”
काही अश्याच प्रकारे निसर्ग चक्रीवादळाच्या प्रकोपानंतर अलिबागकर आता पुन्हा एकदा कंबर कसून आपलं आयुष्य पूर्वपदावर आणण्यासाठी उभे राहिले आहेत त्या तमाम नागरिकांचा पाठीचा कणा मजबूत करून त्याना डोईला छप्पर देण्यासाठी “विवा फाउंडेशन”चे सर्वेसर्वा विक्रांत वार्डे यांनी उमटे गाव, उमटे बौद्धवाडी, डुंगीवाडी, बोरघर, बंगलेवाडी व आसपासच्या परिसरात चक्रीवादळात मोडकळीस आलेल्या घरांना पत्रे वाटप करून गळक्या आभाळाला मायेचं ठिगळ लावण्याचे काम केलं सदर वाटप बोरघर ग्रामपंचायत सरपंच अरुण भगत, जनार्दन भगत, उत्तमभाई रसाळ, माजी सरपंच यशवंत भगत, माजी पंचायत समिती अध्यक्ष धर्मा लोभी, सदस्य प्रदीप रसाळ, उल्हास चाचड, सुरेश मढवी, विवा फाउंडेशन सर्वेसर्वा विक्रांत वार्डे, विवा फांऊंडेशनचे संकल्प केळकर, निनाद रसाळ, राकेश रसाळ, दीपक काळेल, शुभम धुमाळ, साहिल भगत, प्रीतम भगत, सोहम भगत आणि इतर सहकारी यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
विक्रांत वार्डे यांना सदर कामाची प्रेरणा चित्रलेखताई पाटील यांच्या “आपण कितीही मोठे झालो तरी जमिनीवर राहून काम करता आलं पाहिजे, मातीशी असलेली नाळ कधीही तुटता कामा नये” या प्रेरणादायी संदेशातून मिळाल्याची माहिती आमच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली.
भविष्यात ही संस्थेस शक्य तितकी कामे करण्याचा संस्थेचा निर्धार असल्याचे विक्रांत वार्डे यांनी स्पष्ट केले.
www.konkantoday.com