अज्ञात इसमानी ६५हजार किमतीचे बांधकाम साहित्य चोरून नेले
चिपळूण तालुक्यातील ताम्हण माळा पाथर वाडी येथे ठेवलेले ६५हजार किमतीचे बांधकाम साहित्य अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची फिर्याद तुरंबव येथील राहणारे सुनील जाधव यांनी चिपळूण पोलिसांकडे केली आहे जाधव यांनी वरील ठिकाणी बांधकामासाठी लागणारा जांभा चिरा व डबर ठेवला होता अज्ञाताने जेसीबी व डंपरच्या सहाय्याने हा माल चोरुन नेला
www.konkantoday.com