राज्यात यापुढे अनलॉक दोन आणि तीन – आरोग्यमंत्री राजेश टोपे
राज्यात यापुढे लॉकडाऊन असणार नाही तर अनलॉक दोन आणि तीन असणार आहे, अशी घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पुण्यात केली. राज्यात कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत याची चिंता फारशी नाही तर राज्यात मृतांची आकडेवारी वाढत आहे त्याची चिंता जास्त आहे असेही ना. टोपे यांनी स्पष्ट केले. जुलै आणि ऑगस्टमध्ये महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे असे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे.
www.konkantoday.com