
मुंबई महानगरपालिकेच्या मदतकार्य पथकांनी चिपळूणात समर्पित भावनेने केलेल्या कामाची दखल,नामदार उदय सामंत यांच्या हस्ते सन्मान
कोकणातील पूरग्रस्त भागात मुंबई महानगरपालिकेच्या मदतकार्य पथकांनी समर्पित भावनेने केलेल्या कामाची दखल घेत आज राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांच्या हस्ते चिपळूण येथे त्यांचा सन्मान करण्यात आला.यावेळी जि.प.अध्यक्ष विक्रांत जाधव, खासदार विनायकजी राऊत साहेब, आ.भास्कर जाधव, आ. शेखर निकम, जिल्हाप्रमुख सचिन कदम व संबंधित उपस्थित होते.चिपळूण शहरातील स्वच्छतेच्या मोहिमेत या पथकाने मोठी कामगिरी बजावली आहे
www.konkantoday.com