दूध डेअरी फोडून पंचवीस हजार रुपयांची चोरी
खेड महाडनाका येथिल दूध डेअरी फोडून डेअरीत ठेवलेले पंचवीस हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेल्याची तक्रार डेअरीचे मालक आसिफ मेमन यांनी दाखल केली आहे. मेमन यांच्या मालकीचे दूध डेअरी दुकान असून अज्ञात चोरट्याने दुकानाच्या गाळ्याचे शटर उघडून दुकानात प्रवेश करून ड्राव्हरमध्ये ठेवलेले २५ हजार रुपये रोख चोरून नेले.
www.konkantoday.com