
चिपळूण तालुक्यामध्ये एक अल्पवयीन मुलगा बेपत्ता
चिपळूण तालुक्यामध्ये एक अल्पवयीन मुलगा शुक्रवार संध्याकाळपासून बेपत्ता आहे. या प्रकरणी चिपळूण पोलीस स्थानकात अज्ञातांविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी माधवी मारुती दरेकर (रा. चिंचनाका, बापट आळी, चिपळूण) यांनी पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे.यात म्हटल्याप्रमाणे त्यांचा स्वराज संदीप गोठणकर हा इयत्ता सहावी मध्ये शिकणारा बारा वर्षीय भाचा शुक्रवारी संध्याकाळी घरात कोणालाही न सांगता बाहेर पडला. तो दुसऱ्या दिवशी सुद्धा परत आलानाही. त्यामुळे श्रीमती दरेकर यांनी चिपळूण पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे
www.konkantoday.com