कोरोना युद्धाच्या विरोधात बाधित रूग्णांना आधार देणारे कोरोना योद्धे
रत्नागिरी जिल्हा परिषद आरोग्य विभागाचे एक पथक दिवस, रात्र कोरोना बाधित रूग्णांसह त्यांच्या कुटुंबाला आधार देण्याचे काम हे पथक करत आहे. स्वतःला देखील कोरोना होईल ही बाब लक्षात घेवून या पथकातील प्रत्येकजण आपली बॅग घेवून घराबाहेर पडत आहेत.
रूग्ण उपचारासाठी दाखल करताना या पथकाला अनेकदा अडचणी येतात. मात्र अशा परिस्थितीत देखील या पथकाने आपला संयम ढळू दिला नाही. अनेकवेळा रूग्ण घाबरलेल्या स्थितीत असतो अशा वेळी रूग्णाला धीर देण्याचे काम हेच आरोग्य कर्मचारी करतात.
जिल्हा परिषदेचे हे पथक तालुका आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहे. पथकातील अमित कोरगावकर, सुहास गुरव, तुषार साळवी, प्रदीप महाकाळ, अमर विचारे, रोहिणी किडये, शीतल कदम, जाई न्हीवेकर हे पॉझिटीव्ह रूग्णांना आणण्यासाठी दिवस रात्र तयार असतात.
www.konkantoday.com