स्वराज्य कोकण संघटना, महाराष्ट्र व सर्वोदय प्रतिष्ठानची वादळग्रस्तांना मदत
निसर्ग चक्रीवादळाने क्षतीग्रस्त झालेल्या मंडणगड तालुक्यातील बोरखत कोंड, कुडुक पंचक्रोशीतील वादळग्रस्त गावात स्वराज्य कोकण संघटना, महाराष्ट्र व सर्वोदय प्रतिष्ठान, चिपळूण यांच्यावतीने अन्नधान्य किट, ब्लँकेट व तातडीच्या मदतीचे दि. २२ जून रोजी वाटप करण्यात आले.
तालुक्याला ३ जून रोजी आलेल्या निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा बसला. यामुळे झालेल्या नुकसानीच्या बातम्या राज्यात सर्वत्र पोहचल्या. यामुळे अस्वस्थ झालेले मूळचे मंडणगड येथील व सध्या पुणे येथील स्वराज्य कोकण संघटनेचे अध्यक्ष प्रकाश यादव यांनी आपल्या संस्थेच्या व सहकार्यांच्या माध्यमातून माझ्या गावचे मातृभूमीचे काहीतरी देणे लागतो. वादळात तालुक्याचे मोठे नुकसान झाले आहे, आपल्या बांधवांची फुल ना फुलाची पाकळी देऊन मदत केली पाहिजे या सामाजिक भावनेने यादव यांनी नुकसानग्रस्तांना मदत करण्याची कल्पना आपल्या चिपळूण व पुण्यातील मित्रांना बोलून दाखवली. त्यानंतर सर्वोदय प्रतिष्ठानचे शुभम जाधव, सिद्धार्थ आंबेकर, राहुल व्यवहारे, राकेश कुळे, रोहन जाधव, श्रीनाथ गुरव, संदेश किंजळकर, राकेश जाधव, तेजस जंगम, राहुल मुंगळे आदींनी यथाशक्ती योगदान दिले. यातून अन्नधान्य, ब्लँकेट, कपडे यांची मदत बोरखत व कुडुक येथील ग्रामस्थांना केली. तालुक्यातील अनेक गावे निसर्ग चक्रीवादळाने उदध्वस्त झाली आहे. बोरखत कोंड येथे कोणाचीही मदत पोहोचली नसल्याने या गावाची मदतीसाठी निवड केली.
मदतीची वाट न पाहता तालुका पुन्हा उभारण्यासाठी दानशुरांनी मदतीचा खारीचा वाटा उचलल्यास कोकणी माणूस पुन्हा नव्याने उभा राहील, अशी भावना प्रकाश यादव यांनी व्यक्त केली.
www.konkantoday.com