
जिल्ह्यातील पाकिस्तानी महिलांना वास्तव्यासाठी सवलत, विदेश मंत्रालयाकडून दिलासा.
रत्नागिरी जिल्ह्यात वास्तव्यासाठी असणार्या ३ पाकिस्तानी महिलांना विदेश मंत्रालयाकडून दिलासा देण्यात आला आहे. दीर्घकालीन विसा घेवून भारतात या तीन महिलांना वास्तव्यासाठी विशेष सवलत देण्यात आली आहे. त्यामुळे या महिलांना ४८ तासात देश सोडण्याची सक्ती असणार नाही, अशी माहिती रत्नागिरी पोलिसांकडून देण्यात आली.काश्मिर येथील पहलगाममध्ये आंतकवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारकडून कठोर निर्णय घेण्यात आले होते. यात भारतात वास्तव्य करणार्या पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासात देश सोडावे, असे आदेश देण्यात आले होते. दरम्यान जिल्ह्यातील मंडणगड व दापोली येथे तीन पाकिस्तानी महिला वास्तव्य करत असल्याची माहिती समोर आली होती.www.konkantoday.com




