
शिक्षकांना आठवड्यातून केवळ दोन वेळाच शाळेत उपस्थित राहावे लागणार
राज्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्यामुळे शिक्षण विभागाने शाळा सुरू न करता केवळ शैक्षणिक वर्ष सुरू केले. मात्र लॉकडाउन संपल्यानंतरही शिक्षकांना आठवड्यातून केवळ दोन वेळाच शाळेत उपस्थित राहावे लागेल. याबाबतचा अध्यादेश शिक्षण विभागाकडून जारी करण्यात आला.
राज्यातील शाळा ऑनलाइन पद्धतीने सुरू झाल्या आहेत. शाळा सुरू करण्याचे नियोजन आणि ऑनलाइनलर्निंग संदर्भात मुख्याध्यापकांना शिक्षकांना आठवड्यातून दोन वेळा शाळेत बोलविता येणार आहे. त्यामुळे शिक्षकांना शाळेत जाण्याची तयारी करावी लागेल. महिला शिक्षिका, मधुमेह, श्वसनाचे विकार, रक्तदाब, हृदयविकार आणि ५५ वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या शिक्षकांना शाळेत बोलविण्यात येणार नसून, जोपर्यंत प्रत्यक्ष शाळा सुरू होत नाही तोपर्यंत त्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ या पद्धतीने कामे देण्यात येणार आहेत.
www.konkantoday.com