राज्यात काल एका दिवसातील सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येचा आलेख दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होणे दूर आधीपेक्षा झपाट्याने वाढताना दिसत आहे. राज्यात काल एका दिवसातील सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. आज ५ हजार २४ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. परवा ४हजार ८८१ रुग्णांची नोंद झाली होती, ती कालपर्यंतची एका दिवसातील सर्वाधिक रुग्णसंख्या होती. राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या दीड लाखांच्या पार गेली आहे. राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता १ लाख ५२ हजार ७६५ वर पोहोचली आहे. यापैकी ७९ हजार ८१५रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, तर ६५ हजार ८२९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
www.konkantoday.com