राजकीय हेतूने व दबावाखाली आपल्यावर धादांत खोटे आरोप -जयंद्रथ खताते
खेर्डी नळपाणी योजना प्रकरणात माझ्यासह तत्कालीन सरपंच माझी पत्नी व अधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हे गुन्हे धादांत खोटे आहेत, राजकीय हेतूने व दबावाखाली हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष जयंद्रथ खताते यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. खेर्डीची लोकसंख्या आता २० हजाराच्या घरात आहे. त्यामुळे ही १४ कोटींची पाणी योजना व्हावी ही आमची प्रामाणिक इच्छा आहे. यासाठी लागणारा रस्ता किंवा अन्य सहकार्य करून ग्रामस्थांनी विकासात सहभागी व्हावे अशी आपली अपेक्षा आहे. आम्ही कोणताही गुन्हा केलेला नाही. जे काही केलेय ते खेर्डीच्या विकासासाठीच हे लोकांनाही माहित असल्याचे श्री. खताते यांनी यावेळी सांगितले.
www.konkantoday.com