
कोकण रेल्वेच्या कर्मचार्याचा गोव्यात काेराेना अहवाल पॉझिटिव्ह ,संपर्कात आलेल्या कर्मचाऱ्यांना कोरंटाइन
कोकण रेल्वेच्या अलीकडेच भरती केलेल्या काही कर्मचाऱ्यांचे रत्नागिरी येथे प्रशिक्षण चालू असल्याने हे सर्व प्रशिक्षणार्थी रत्नागिरी येथे कोकण रेल्वेच्या रूममध्ये राहत होते त्या कर्मचाऱ्यांमध्ये गार्ड असलेला कर्मचारी हाेता हा कर्मचारी त्यानंतर गोव्यात वेर्णा येथे रेल्वेच्या कामासाठी गेला असता त्याची तेथे काेराेना तपासणी करण्यात आली त्या मध्ये त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला त्यामुळे कोकण रेल्वे कर्मचाऱ्यांच्यात खळबळ उडाली या कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आलेल्या रत्नागिरी येथील काही कर्मचाऱ्याना खबरदारीचा उपाय म्हणून कोराेन्टाइन करण्यात आले आहे
www.konkantoday.com