
बावीस दिवसानंतर गावामध्ये लाईट आले म्हणून फटाके लावणार्याना तरुणाला मारहाण
दापोली तालुक्यात फटाके लावल्याचा राग धरून अडखळ जुईकर मोहल्ला येथील रियान युनूस वाकणकर व काहीनी महिला व तिच्या मुलाला अश्लील शिवीगाळ करत बेदम मारहाण केल्याचा प्रकार गुरुवारी रात्री घडल्याने खळबळ उडाली आहे. केली असल्याची फिर्याद अडखळ जूईकर मोहल्ला येथील तब्बसुम निसार माटवणकर यांनी दापोली पोलिस स्थानकात दिली आहे. तब्बल बावीस दिवसानंतर गावामध्ये लाईट आल्याचा आनंद व्यक्त करण्यासाठी अडखळ जुईकर मोहल्ला येथील फिर्यादी चा मुलगा नाहीद माटवणकर या तरुणाने फटाके लावले होते. मात्र, फटाके का फोडले असा जाब विचारत याच गावातील रियान युनूस वाकणकर, जाशीम शरीफ जाककर या दोघांनी मारहाण करून ठार मारण्याची फिर्याद तब्बसुम निसार माटवणकर यांनी दिली आहे
www.konkantoday.com