
जगबुडी नदीपात्रात वृद्धेचा बुडून मृत्यू
खेड : शहरानजीक जगबुडी नदीपात्रात दि. ८ रोजी १२.४५ वाजण्याच्या सुमारास मटण मार्केटनजीक वृध्द महिला पाण्यात तरंगताना आढळून आली. तिला कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मृत घोषित केले आहे. चंद्रभागा दगडु मोरे (वय ६५, रा.मोहाने तळावाडी खेड) असे मृत महिलेचे नाव असून अधिक तपास पोलिस करत आहेत.