कोकणात आगामी दोन दिवस वादळी पावसाची शक्यता

कोकणात गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. मात्र, पावसाला पोषक हवामान असल्याने आगामी दोन दिवस वादळी पावसाची शक्यता कुलाबा वेधशाळेने वर्तविली आहे. यामुळे कोकण किनारपट्टी भागात असलेल्या चक्राकार वार्‍यांच्या स्थितीमुळे गायब झालेला पाऊस सुरू होण्याची शक्यता आहे.
आगामी दोन दिवस जिल्ह्यात जोरदार वारे, मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. शुक्रवारी काही ठिकाणी हलका पाऊस झाला. त्याचप्रमाणे अत्यंत अपवादात्मक होते तर अनेक भागात पावसाने उघडीप दिली होती.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button