आपला आवडता चेहरा मास्कवर, रत्नागिरीतील मिहीर फोटो स्टुडिओचा उपक्रम

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आता आपल्याला अनेक महिने चेहर्‍यावरील मास्कासून सुटका नाही. त्यामुळे दिवसेंदिवस मास्क हा आपला अविभाज्य अंग बनत चालला आहे. नेहमीचेच मास्क घालण्यापेक्षा मास्कमध्येही विविधता येवू लागली आहे. यामध्ये ड्रेसवरील मॅचिंग मास्कपासून अगदी लग्नकार्यात मिरवण्यासाठी चांदीच्या मास्कचीही निर्मिती होवू लागली आहे. रत्नागिरीतील समीर जुवेकर यांच्या जयस्तंभ येथील मिहीर फोटो स्टुडिओत आता आगळ्या मास्कची छपाई होत आहे. आपल्या अथवा आपल्या व्यक्तीच्या वा अभिनेत्याच्या चेहर्‍याचा अर्धा मास्क येथे बनवून मिळतो. हा मास्क घातल्यानंतर आपल्याला पूर्ण चेहरा असल्याचा भास होतो. मास्क बनवण्यासाठी आपल्या नाकाचे मोजमाप घेतले जाते व त्यानंतर आपल्याला हवा असलेला फोटो मास्कवर प्रिंट केला जातो. त्यामुळे हा मास्क घातला की आपण पूर्ण चेहर्‍यातच वावरत असल्याचा भास होतो. जुवेकर यांनी नुकताच हा उपक्रम सुरू केला असून सध्या या आगळ्यावेगळ्या मास्कची किंमत ८० रुपये ठेवण्यात आली आहे. या मास्कला ग्राहकांचा प्रतिसाद मिळेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button