
आठवडा बाजारात पाण्याच्या टाकीजवळ बसलेल्या इसमावर चाकूने हल्ला
रत्नागिरी येथील विनोद गोराळे हे आठवडा बाजारच्या मागील बाजूस असलेल्या पाण्याच्या टाकीच्या पायर्यांवर बसले असताना एक अनोळखी इसम त्यांचेजवळ आला. त्याने फिर्यादी विनोद यांचेकडे पैसे मागितले. मात्र फिर्यादीने पैसे देण्यास नकार दिल्यावर राग आल्याने सदर आरोपीने पॅन्टच्या खिशातून चाकू काढून फिर्यादीच्या मानेवर वार केला. त्यानंतर फिर्यादीने त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता त्याने फिर्यादीच्या हाताला व दंडाला चावा घेवून त्याच्या हातातून निसटून गल्लीत पळून गेला. याबाबत अज्ञात इसमाविरूद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
www.konkantoday.com